Search
Close this search box.

बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बँकेच्या लॉकरमध्ये सर्वसामान्य नागरिक किंवा उद्योजक, बँकेचे खातेदार आपलं सोनं नाणं आणि महत्त्वाच्या मौल्यवान वस्तू ठेवतात. बँकेच्या (Bank) कार्यक्षमतेवरुन विश्वास ठेवत ह्या वस्तू सुरक्षित असल्याचे मानून ग्राहक निवांत असतो. मात्र, बँकेच्या लॉकरमधून सोनं-नाणं गायब झाल्यास सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. विशेष म्हणजे आता शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी आमदारांच्याच मौल्यवान वस्तू आणि रिव्हॉल्वर बँकेच्या लॉकरमधून चोरीला गेल्याने खलबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते कृष्ण हेगडे यांच्या बँकेतल्या लॉकरमध्ये (Locker) चोरीची घटना समोर आली असून लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान ऐवज आणि रिव्हॉल्वर चोरीला गेली आहे. यासंदर्भात, कृष्णा हेगडे यांनी मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेतील बँकेच्या शिवसेना नेत्याचा हा मौल्यवान ऐवज आणि बंदुक लॉकरमधून चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा हेगडे यांनी सप्टेंबर महिन्यात मौल्यवान दागिने आणि आपली परवानाधारक रिव्हॉल्वर बँकेत जमा करुन ठेवली होती. मात्र, आता हे सर्व सामान बँकेच्या लॉकरमधून गायब असल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरी कोणी केली? लॉकरमधील वस्तू नेमक्या कशा गायब झाल्या याचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, कृष्णा हेगडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कर्नाटक बँकेत गेल्या 40 वर्षांपासून बँकिंग सुविधांचा वापर केला जात आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी कृष्णा हेगडे यांनी बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेत जाऊन आपल्या बँक लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू आणि पैसे ठेवले होते. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2025 रोजी ते पुन्हा बँकेच्या शाखेत गेले. त्यावेळी त्यांनी बँक लॉकर उघडला, असता त्यांना विसंगती आढळली आणि काही पैसे व मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं दिसून आलं. यासंदर्भात शाखा व्यवस्थापक मनीष कुमार, क्लस्टर व्यवस्थापक हरी सरीन आणि डीजीएम राजगोपाल भट्ट यांच्यासोबत मिटिंग घेतली. परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असं कृष्णा हेगडे म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें