मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि ते ताबडतोब आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, तर बॉम्ब निकामी पथकाकडून विमानाची कसून तपासणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.








