आयपीएल 2025 (ipl 2025) चा यंदाचा सीजन शेवटाकडे वळत असतानाच आता त्याचा उत्साह काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे आणि ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहत भारतीय सैन्याचे कौतुक करत आहे याशिवाय त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने मन जिंकले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते हार्दिकचे कौतुक करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/DFnIL_JSEdN/?utm_source=ig_embed&ig_rid=e32014f1-14e7-4714-9c4e-09e22ce64759
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एअरपोर्टवर प्रवेशाच्या वेळी, हार्दिकला गेटवर भारतीय जवान दिसतो. त्यांना बघताच हार्दिक त्यांना सलाम ठोकतो आणि नंतर हात मिळवतो. त्यानंतर तो जवानाच्या पाठीवर थापही मारतो आणि निघून जातो. अशाप्रकारे हार्दिकने भारतीय सैन्याचे कौतुक केले. त्याने या आधीही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता, त्यानंतर त्याने ऑपरेशन सिंदूर साठी भारतीय सैन्याचे खूप कौतुक केले होते.
आयपीएल रद्द
8 मे पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरु झाला आहे. भारताने पाकिस्तानवर पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हल्ला केला. नंतर पाकिस्तानने अचानक भारतावर ड्रोन हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आयपीएल 2025 वरही दिसून आला. आयपीएल एका आठवड्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे नवीन वेळापत्रक कसे असेल यावर आठवड्यानंतर चर्चा होईल.
