संपूर्ण महाराष्ट्रात होलिका दहनाचा सण मोठ्आ उत्साहात साजरा केला जात असून, मुंबईतील काही कोळीवाड्यांमध्ये हा सण प्रत्यक्ष होलिका दहनाच्या एक दिवस आधी साजरा करण्ता आला. होळी आणि त्यानंतर येणापं रंगपंचमीचं पर्व पाहता या उत्साहाच्या वातावरणात कुठेही गैरप्रकारामुळं गालबोट लागायला नको यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण तयारी केली असून, नागरिकांना स्पष्ट सूचना करत त्यासंदर्भातील कठोर नियमावलीसुद्धा जारी केली आहे. या संपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांमध्ये मुंबई शहरामध्ये तब्बल 11000 हून अधिक पोलिसांटा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असेल. तर, साध्या गणवेशामध्ये पोलीस शहरातील विविध भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन केलं जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील.
कशी आहे शहरातील पोलीस व्यवस्था?
शहरात पुढील काही दिवस साध्या गणवेशातील पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळं पोलिसांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई केली जाणार आहे. मंगळवार, 18 मार्च मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासमवेत 7 अपर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 1767 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदार सुरक्षेत तैनात असतील असं अधिकत माहिती पत्रकात सांगण्यात आलं आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होमगाईस, एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी, बीडीडीएस टीम यांचाही चोख बंदोबस्त असेल.
होळी आणि रंगपंचमीच्या सणादरम्यान सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगाचं पाणी उडविणं, कोणत्याही प्रकारची अश्लील टीका किंवा टीप्पणी करणं अशी कृत्य कारवाईस पात्र असतील.
होळी आणि रंगपंचमीच्या उत्सवादरम्यान अश्लील शब्द किंवा सार्वजनिक ठिकाणी घोषणा देण्यापासून किंवा अश्लील गाणी गाणं, तत्सम हावभाव किंवा नक्कल करणं, चित्रं, चिन्हं, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचं प्रदर्शन- प्रसार करणं, ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावली जाऊ शकते. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवपदार्थाने भरलेले फुगे तयार करणं किंवा फेकणं अशा कोणत्याही कृत्य करणाऱ्यास कठोर कारवाईचा सामना करावा लागेल असं पोलीस यंत्रणेकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करत गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉइंट बंदोबस्त असतील. वाहतूक नियमांचे उल्लंघन व ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, अनधिकृत मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना, मद्यपान करून वाहन चालवणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे व्यक्ती, अमली पदार्थ विक्री तसेच सेवन यांसारखी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
