नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत असून लवकरच प्रवाशांसाठी हे विमानतळ खुले केले जाणार आहे. 17 एप्रिलपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात येतील, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी एका खास नवीन टर्मिनल बांधण्याची योजना आखण्यात येत आहे.
बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि अति महत्त्वाचे नेते, मंत्री यांच्यासाठी नवी मुंबई विमानतळावर एक समर्पित असलेल्या वेगळं टर्मिनल बनविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन विमानतळाच्या व्यावसायिक उद्घाटनानंतर सुरू होणाऱ्या विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) एक वेगळं टर्मिनल बांधण्याची योजना आखत आहे.
बॉलिवूड कलाकार आणि व्हिव्हिआयपी प्रवाशांसाठी असलेले हे टर्मिनल 2030 पर्यंत सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, अशी माहिती समोर येत आहे.
भारतातील सर्वात मोठे विमानतळ
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकांचे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांबीचा असून एकाचवेळी 350 विमाने उभे राहू शकतील इतकी या विमानतळाची क्षमता आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार आहे. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल. देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.
नवी मुंबई विमानतळासाठी जबरदस्तीने भूसंपादन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तातडीने जमीन संपादित करता यावी याकरिता जमीन मालकाची बाजू न ऐकता भूसंपादन कायद्यात मनमानी पद्धतीने नवा निकष समाविष्ट करण्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सिडकोवर ताशेरे ओढले आहेत
