Search
Close this search box.

IIT बाबा अभय सिंग पोलिसांच्या ताब्यात, हॉटेलमध्ये तपासणी केली असता जे दिसलं ते पाहून अधिकारी चक्रावले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाकुंभमेळ्यादरम्यान प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा अभय सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी तो कोणत्याही चांगल्या नाही तर नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. जयपूरमध्ये पोलिसांनी आयआयटी बाबा अभय सिंगला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना त्याच्याकडे गांजा सापडला आहे. त्याच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बाबा अभय सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्महत्येची धमकी दिली होती. यानंतर जयपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. शिप्रा पथ पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक राजस्थानच्या राजधानीतील रिद्धी सिद्धी पार्कजवळील क्लासिक हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी यावेळी त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे गांजा सापडला. दरम्यान बाबाने प्रसारमाध्यमांशी बोलताना हा प्रसाद असल्याचा दावा केला आहे. तसंच आपल्याविरोधा गुन्हा दाखल झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, त्याच्याकडे आढळलेल्या गांजाचे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेत असल्याने पोलिसांनी त्याला थोड्या काळासाठी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिलं. चौकशीदरम्यान आयआयटी बाबाने दावा केला की तो अघोरी बाबा आहे आणि तो प्रथेनुसार गांजा सेवन करतो.

अभय सिंग रिद्धी सिद्धी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहून गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याच्याकडून गांजा जप्त केला.

दरम्यान आयआयटी बाबाने पोलीस रुममध्ये तपासणी करत असतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर केला आहे. गेल्या दोन तासांपासून तपासणी सुरु असून, पोलीस मला व्हिडीओही काढू देत नव्हते असा आरोप त्याने केला आहे. मी रात्रभर झोपलो नाही. मला नको तुमचं सनातन, मी दुसऱ्या देशात जाऊनही सनातन करु शकतो. आपले ज्ञानी लोक तुमच्याकडे ठेवा. पोलीस आज माझा वाढदिवस साजरा करत आहे असं तो व्हिडीओत सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें