अवघ्या राज्याला हादरवून सोडणार्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वाल्मीक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलं असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वार्मिक वाल्मीक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे.
या आरोप पत्रामध्ये विष्णू साठे दोन नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खड्णी वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झालं आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मीक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत.
त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गेल्या प्रत्येक दिवसांपासून खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघा महाराष्ट्रात राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आरोपपत्रामध्ये तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे.
