छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी या शोमध्ये सुरु असलेला वाद तर कधी दुसरं काही. आता हा शो चर्चेत येण्याचं कारण ‘बिग बॉस 18’ ठरला आहे. या सीझनमध्ये विजेत्याची ट्रॉफी ही करणवीर मेहरानं त्याच्या नावी केली. करणवीर मेहरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला विजेत्याची रक्कम ही मिळाली नाही असं म्हटलं आहे.
करणवीर मेहरानं भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करणवीरनं तिच्या विनोदी बुद्धीनं भारती आणि हर्ष यांना खूप हसवलं. इतकंच नाही तर करण आणि हर्ष एकमेकांना रोस्ट करताना दिसले. करणनं खुलासा केला की त्याला अजून ‘बिग बॉस 18’ ची प्राइज मनी मिळालेली नाही. तर करणवीरला विनिंग अमाउंट ही अजून मिळालेली नाही.
हर्षनं करणला सांगितलं की ‘त्या 50 लाखातून टॅक्स देखील कट होणार. त्यावर तो मस्करी करत म्हणाला, ते टॅक्स देणार नाहीत. मी देणार सगळे टॅक्स देणार. खतरो के खिलाडीचे पैसे आलेत. त्याच पैशांची थोड्याच दिवसात एक गाडी येणार आहे. करणनं सांगितलं की त्यानं खतरो के खिलाडी आणि बिग बॉस 18 आधी कधीच कलर्ससोबत काम केलं नव्हतं.’
पुढे करणवीर म्हणाला, ‘हे सगळं देवानं ठरवलेलं होतं. माझ्या विजयात कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान दिलं आहे. मी आतमध्ये फक्त मस्ती करत होतो. हरणार की जिंकणार याकडे मी लक्ष देत नव्हतो. यात तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात ते दाखवायचं होत आणि माझं व्यक्तीमत्त्व लोकांना प्रचंड आवडलं. बिग बॉसमुळे मला जे प्रेम मिळालं ते खूप जास्त आहे. मी चाहत्यांसोबत खूप वेळ व्यथित करतोय. सगळ्यात जास्त म्हणजे काकूंकडून, त्या मला खूप आशीर्वाद देत आहेत.’
पुढे करण म्हणाला, चाहत्यांकडून जे प्रेम मिळालं त्यानं त्याला फार आनंद झाला. आधी लोकं त्याच्या भूमिकांना प्रेम द्यायचे आणि आता त्याला प्रेम देत आहेत.
