Search
Close this search box.

ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. वायदे बाजारात उच्चांकी दरवाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचे दर घसरले आहेत. सोनं जवळपास 200 रुपये तर चांदी 1000 रुपयांपर्यंत घसरले आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2800 डॉलरच्या जवळपास स्थिरावले आहे. तर यावेळी चांदीजेखील 959 रुपयांनी घसरून 90,640 रुपयांवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळं लिलावी होण्याच्या कारणामुळं शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात सातत्याने उच्चांकी गाठत होते. मात्र, आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 170 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 82,250 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी होऊन 75,400 रुपयांवर घसरले आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 130 रुपयांची घट होऊन सोन्याचे दर 61,690 रुपयांवर स्थिरावले आहेत.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 75,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 82,250 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 61,690 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,540 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,225 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,169 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 60,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 65,800 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 49,352 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 75,400 रुपये
24 कॅरेट- 82,250 रुपये
18 कॅरेट- 61,690 रुपये

admin
Author: admin

और पढ़ें