चारचाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तुम्हाला याबद्दल माहिती असायला हवे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. काय आहे हा निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.
वाहनचालकांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरुन जाताना कर वसूलीसाठी याचा उपयोग होतो. आधीच असा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची 100 टक्के अंमलबजावणी नव्हती. एक कॅश काऊंटर ठेवण्यात आले होते. पण 1 एप्रिल पासून नियम बंधनकारक करण्यात आला आहे.
