Search
Close this search box.

रात्रीच्या अंधारात अग्नितांडव; वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकं होरपळली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

झाशीतील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकिय महाविद्यालयाच्या (Maharani Laxmi Bai Medical College) एनआयसीयू विभागात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. आगीचं स्वरुप इतकं भीषण होतं, की तिथं असणाऱ्या चाईल्ड वॉर्डची खिडकी तोडून बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा या घटनेमध्ये स्वत: लक्ष घालत असून, त्यांनी तातडीनं तपासयंत्रणा कामाला लावत 12 तासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. घटनास्थळी पोहोचलेल्या उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही सदर प्रकरणी दोषींना मोकळीक दिली जाणार नसल्याचा इशारा दिला.

झाशी वैद्यकिय महाविद्यालयाच्या लहान मुलांच्या (एनआयसीयू) विभागात शुक्रवारी मध्यरात्र उलटून साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग धुमसण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आगीनं इतकं भीषण स्वरुप धारण केलं की, यामध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. आग इतक्या भीषण स्वरुपात होती, की कक्षाच्या खिडक्या तोडून त्यानंतर तिथून 37 मुलांना बाहेर काढण्यात आलं, याच मार्गानं मृत बालकांनाही इथून बाहरे काढण्यात आले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान अद्याप या आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

आग लागण्याची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण, बचावकार्यात कैक अडथळे आल्यानं अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला. प्राथमिक स्वरुपात ही आग शॉट सर्किटमुळं लागल्याची माहिती समोर आली असली तरीही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं एक समिती स्थानपन केली आहे.

ही आग एनआयसीयूमध्ये आतील कक्षाला लागली. सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि रुग्णालयात एकच गोंधळ माजला. सुरुवातीला काही क्षण नेमकं काय घडलं हेच कोणाच्या लक्षात आलं नाही, तितक्यातच कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या एनआयसीयू कक्षातून धूर येताना दिसला आणि आग लागल्याचं लक्षात आलं.

admin
Author: admin

और पढ़ें