Search
Close this search box.

भर पावसात सभा… महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर! शरद पवारांप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटर्जी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भर पावसात सभा हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शदर पवार यांच्या प्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. पावसात भिजत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. तसेच पावसात भिजत भाषण केले की सीट निवडुण येते असे शुभ संकेत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सांगली शिराळामध्ये सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. फडणवीस यांचे भाषण सुरु असताना पाूस पडला. पावसात भिजलो तर सीट जिंकते असे शुभ संकेत असल्याचे फडणवीस म्हणाले. पावसात भिजलो तर उमेदवार जिंकणार, ही काळा दगडावरील पांढरी रेष आहे. त्यामुळे शिराळामध्ये सत्यजित देशमुख याचा विजय निश्चित आहे. पावसात सभा घेतली की शीट निवडून येतात. असे शुभ संकेत आहेत. नेत्याचं म्हणणं आहे की पावसात सभा घेतला की निवडून येतात असंही फडणवीस म्हणाले.

भर पावसात शरद पवार यांचे भाषण
सांगलीमध्ये शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली. या सभेला स्वतः शरद पवार उपस्थित आहेत. इस्लामपूरमधील या सभेत संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र भर पावसातही कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन उभे असलेले पाहायला मिळालं.

इचलकरंजीत शरद पवारांच्या भाषणावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे…महाराष्ट्रात अनेक वेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होत असल्याचं सभेत पवार यांनी म्हटलंय…तसेच भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागत असल्याचंही पवार यांनी म्हटलंय.

admin
Author: admin

और पढ़ें