देश

DC vs RCB: WPL चॅम्पियन बनल्यानंतर बंगळूरूच्या ‘टीमवर पैशांचा पाऊस; दिल्ली कॅपिटल्सही झाली मालामाल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फ्रेंचायझीसाठी रविवारचा दिवस फारच खास ठरला. आरसीबीने रविवारी 16 वर्षाचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. आयपीएलच्या 16 सिझनमध्ये विराट कोहली आरसीबीसाठी जे करू शकला नाही ते स्मृती मंधानाने दुसऱ्याच सिझनमध्ये करून दाखवलं. पहिल्यांदाच आरसीबीने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली. दरम्यान पहिल्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर स्मृती मंधानाच्या टीमवर पैशांचा पाऊस पडला आहे.

मालामाल झाली आरसीबीची टीम
विमेंस प्रिमीयर लीगच्या फायनल सामन्यात विजय मिळवल्यानंतर आरसीबीला 6 कोटी रूपयांचं बक्षीस मिळालं आहे. याशिवाय दिल्लीच्या टीमला 3 कोटी रूपये मिळाले आहेत. WPL 2023 मध्ये देखील दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या वेळी दिल्लीचा फॉर्म पाहता त्यांचा विजय होईल असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही. आरसीबीने बाद फेरीतील सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत स्पर्धा जिंकली.

श्रेयंका पाटिललाही मिळाली मोठी रक्कम
यंदाच्या वेळी आरसीबीने केवळ ट्रॉफीच नाही जिंकली, तक पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या मानकरीही या टीममधील दोन खेळाडू ठरल्यात. आरसीबीच्या श्रेयंका पाटिलला पर्पल कॅप आणि एलिस पेरीला ऑरेंज कॅप मिळाली. श्रेयंकाने या सिझनमध्ये सर्वाधिक 13 विकेट्स घेतले. तर एलिस पेरीने 347 रन्स करत ऑरेंज कॅप मिळवली.

यावेळी दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळाले. याशिवाय यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू ठरली. तिला पाच लाख रुपये मिळाले. श्रेयंकाला इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कारही मिळाला. त्यासाठी तिला 5 लाख रुपयेही मिळाले. अशा प्रकारे श्रेयंकाला एकूण 10 लाख रुपये मिळाले. दरम्यान फायनल सामन्यात 3 बळी घेणाऱ्या आरसीबीच्या सोफी मोलिनक्सला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला.

फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा विजय
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरुवात चांगली झाली मात्र पहिली विकेट पडताच पुढच्या फलंदाजांना डाव सावरता आला नाही. दिल्लीची संपूर्ण टीम 18.3 ओव्हर्समध्ये 113 रन्समध्ये गारद झाली. यावेळी आरसीबीने 19.3 ओव्हर्समध्ये 2 विकेट्, गमावून 115 रन्स करून सामना आणि स्पर्धा जिंकली. आरसीबीतर्फे श्रेयंका पाटीलने 4 आणि सोफी मोलिनक्सने 3 विकेट्स घेतले. एलिस पॅरी 35 रन्स करून नाबाद राहिली. स्मृती मंधानाने 32 रन्स केल्या.

Related Articles

Back to top button