देश

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल, गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

मुंबई मडगाव (गोवा) वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे. मात्र त्याची बुकिंग कालपासून सुरु झाली आहे. मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गोव्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे.

गणेशोत्सवासाठी वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद
मुंबईकर चाकरमान्यांनीही गणेशोत्सवासाठी वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद दिला असून 18 सप्टेंबरला आता वेटिंग लिस्ट लागली आहे. 530 सीटर वंदे भारतची 18 सप्टेंबरची सर्वच्या सर्व तिकिटं विकली गेली आहेत. 18 सप्टेंबरला EXECUTIVE कारसाठी 20 पेक्षा जास्त वेटिंग दाखवत आहे. तर चेअरकारची वेटिंग लिस्ट 140च्या पुढे गेली आहे. तेव्हा सणासुदीला या गाडीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर ‘इतके’ असणार, अधिक जाणून घ्या

पेण स्टेशन येथे विशेष गाड्यांना थांबा
दरम्यान, गणपती उत्सव विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. विशेष रेल्वेच्या 156 फेऱ्या मध्य रेल्वेने जाहीर केल्या होत्या. प्रवाश्यांची मागणी लक्षात घेता, मध्य रेल्वे खालील 80 फेऱ्यांना पेण स्टेशन येथे थांबे जाहीर केले आहेत. 01171/72- CSMT-सावंतवाडी विशेष- 40 फेऱ्या आणि 01153/54- दिवा- रत्नागिरी विशेष- 40 फेऱ्या या गाड्यांना पेण येथे आता थांबा मिळणार आहे.

मुंबई मडगाव वंदे भारत आजपासून धावणार
मुंबईहून गोव्याला आता सुपरफास्ट वेगात जाता येणारेय. कारण मुंबई मडगाव वंदे भारत आजपासून सुरु होणार आहे. 8 तासांत हे अंतर पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मडगाव-मुंबई वंदे भारतसोबत बिहार, झारखंड शहरांसाठी वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन 28 जूनपासून पावसाळ्यात आठवड्यातून तीन दिवस धावेल. तर पावसाळ्यानंतर 1 नोव्हेंबरपासून शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम इथं थांबे असतील.

Related Articles

Back to top button