देश

आताची मोठी बातमी! ‘सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ताबा घ्यावा….’ भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) सरकारने ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. ठाकरे स्मारकाची पूर्ण देखभाल राज्य सरकारनेच करावी, या स्मारक समितीवर ठाकरे कुटुंबीयांपैकी एक किंवा दोन सदस्य घ्यावेत या अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. बाळासाहेबांचं स्मारक कुठल्या वैयक्तिक कुटुंबाचे किंवा खानदानाचं नाहीये असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री करणार स्मारकाची पाहणी
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ठाकरे स्मारकाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळीही ते वंदन करतील. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे आमदार, खासदार आणि नेते यावेळी शिवाजी पार्कला उपस्थित असणार आहेत. 17 नोव्हेंबर म्हणजे उद्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिन आहे. तो वाद टाळण्यासाठी आजच शिंदे गटातील आमदार स्मृतिस्थळाला अभिवादन करणारेत.

संजय राऊत यांची टीका
शिंदे गटाचे आमदार बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंसह आमदारांना टोला लगावलाय. हातातले खंजीर बाजूला ठेवा, मग स्मारकाला वंदन करा असं राऊतांनी म्हटलंय. तर खोचक कुणीही बोलू शकतं, काम करण्यापेक्षा बोलण्याला महत्त्व दिलं तर महाराष्ट्र मागे पडेल असं म्हणत केसरकरांनी राऊतांना खोचक टोला लगावलाय.

Related Articles

Back to top button