शेअर मार्केटमध्येही महाराष्ट्र आघाडीवर; NSE वर फक्त ७ महिन्यात १ कोटी गुंतवणूकदारांची नोंदणी
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येने सोमवारी ५ कोटींचा आकडा पार केला. स्टॉक एक्सचेंजने(Stock Exchange) म्हटले की, तीन कोटी रजिस्टर्ड गुंतवणूकदारांवरून ४ कोटींपर्यंतचा टप्पा १५ महिन्यात पार झाला होता. त्यानंतरचे एक कोटी गुंतवणूकदार फक्त ७ महिन्याहून कमी दिवसात एनएससीवर नोंदवले गेले. त्यामुळे एनएससीने ५ कोटी गुंतवणूकदारांचा आकडा पार केला आहे.
एक्सचेंजसोबत रजिस्टर्ड युनिक क्लाइंट कोडची एकूण संख्या 8.86 कोटी आहे. क्लाइंट एकाहून अधिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करू शकतात.
१० कोटींचे लक्ष
एनएससीचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांनी म्हटले की, ‘आजपर्यंत नोंदणी झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या मैलाचा दगड आहे. सरकार, SEBI आणि सर्व स्टॉकहोल्डर्सतर्फे देण्यात आलेले प्रोडक्ट, थेट ग्राहक ऑनबोर्डिंग प्रोसेस, इन्वेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता या सर्वांचा हा संमिश्र परिणाम आहे.’
त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही पुढील ३-४ वर्षात १० कोटी युनिक इन्वेस्टरचे (Target) लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.
एकूण 7.2 कोटी डीमॅट अकाउंट (demat account)
देशातील दोन डिपॉजिटरी CDSL आणि NSDL कडे एकूण 7.02 कोटी डिमॅट अकाउंट आहेत. ज्यामध्ये एका गुंतवणूकदाराकडे एका पॅन क्रमांकावर अनेक डीमॅट अकाउंट सामील आहेत.
कोणत्या राज्यातून किती हिस्सेदारी
उत्तर भारतीय राज्यांनी एनएससीवर नवीन गुंतवणूकदारांमध्ये 36 टक्क्यांचे योगदान दिले आहे. पश्चिमेच्या राज्यांमध्ये ३१ टक्के, दक्षिणेच्या राज्यांमद्ये ३० आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये 13 टक्के लोकांची हिस्सेदारी आहे.
राज्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक म्हणजेच 17 टक्के शेअर मार्केट गुंतवणूकदार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश १० टक्के आणि गुजरात ७ टक्के इतके आहेत.