अपराध समाचार

धक्कादायक… ड्रग्स तस्करांमध्ये गोळीबार, ट्रॅव्हल ब्लॉगरची हत्या

मेक्सिकोमध्ये वाढदिवसाठी गेलेल्या भारतीय महिलेची झालेल्या गोळीबारात हत्या झाली आहे. गोळीबारात प्राण गमावलेल्या महिलेचं नाव अंजली रयोत असं आहे. अंजली हिमाचलमध्ये राहते. अंजली वाढदिवस साजरा करण्यासाठी पती उत्कर्षसोबत मेक्सिकोमध्ये गेली होती. पण ड्रग्जची तस्करी करणाऱ्या गटांमध्ये गोळीबार झाला आणि त्यात अंजलीला आपला जीव गमवावा लागला.

अंजलीच्या हत्येमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. आता तिच्या कुटुंबाकडे फक्त तिच्या आठवणी उरल्या आहेत. अंजलीचे वडील सांगतात, अंजलीसोबत गेल्या वर्षी सोलनमध्ये जवळपास 4 महिने राहिलो. ती डिप्लोमा करण्यासाठी परदेशातून मुंबईत आली होती.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर ती हिमाचलमध्ये गेली. यानंतर अंजली पुन्हा कॅलिफोर्नियाला गेली. वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसोबत मेक्सिकोला पोहोचली. 22 ऑक्टोबर रोजी अंजली पतीसोबत होती आणि मेक्सिकोमध्ये डिनर करण्यासाठी गेली होती. पण अंजली एका दुकानातून आईस्क्रीम खरेदी करत असताना तिथे गोळीबार सुरू झाला.

या गोळीबारात अंजलीलाही आपला जीव गमवावा लागला. उत्कर्षने ही घटना शिकागो येथे राहणारा अंजलीचा भाऊ आशिषला सांगितली. त्यानंतर आशिषने हिमाचलमध्ये असलेल्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.

काय काम करायची पीडिता?
अंजलीचे वडील सांगतात की त्यांची मुलगी नोकरी करत होती, याशिवाय ती ट्रॅव्हल ब्लॉगर देखील होती. सगळीकडे फिरणे हा एक तिचा मोठा छंद होता. हाचं छंद तिला मॅक्सिकोलाही घेऊन गेला होता. मात्र तिथे ती गोळीबाराची शिकार झाली आणि तिला आपला जीव गमवावा लागला. तूर्तास अंजलीचे कुटुंबीय तिचा मृतदेह भारतात आणण्याची तयारी करत आहेत.

Related Articles

Back to top button