देश

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केला 100 कोटींचा दावा

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी आरोपांची मालिका सुरु केली आहे. किरिट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होती. याप्रकरणी 72 तासात किरिटी सोमय्या यांनी माफी मागवी असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. पण 72 तास उलटल्यानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

अनिल परब यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. ‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केलं होतं. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

किरिट सोमय्या यांचे आरोप
अनिल परब यांनी कोकणातील दापोली इथं बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. तसंच परिवहन विभागात अनिल परब बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी 14 सप्टेंबरला अनिल परब यांनी वकीलांतर्फे सोमय्यांना एक नोटीस पाठवली होती. माफी मागा अन्यथा 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं या नोटीसीत म्हटलं होतं. याला उत्तर देताना अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.

Related Articles

Back to top button