Search
Close this search box.

मुंबईतून आणखी एका अतिरेक्याला अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिल्लीत सहा अतिरेकी अटक झल्यानंतर मुंबई कनेक्शन उघड झालं होतं. आता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणखी एकाला अटक केली आहे.

धारावीत राहणारा जान मोहम्मद शेख याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा हँडलर जाकीर हुसेन शेख या अतिरेक्याला मुंबईतून (mumbai) अटक केली होती. आता मुंबई एटीएसने धडक कारवाई करत आज आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून रिजवान मोमीन (Rizwan Ibrahim Momin) असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे.

अटक करण्यात आलेले जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोघंही जान मोहम्मद शेखकरवी काम करत असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत.

सणासुदीच्या काळात स्फोट घडवण्याचा कट
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. सणासुदीच्या काळात गर्दीच्या भागांव्यतिरिक्त, अतिरेक्यांच्या निशाण्यावर मोठे पूल आणि रेल्वे ट्रॅक होते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर या वेळी अतिरेक्यांचा स्फोट घडवून आणण्याचा कट होता.

पकडलेले दहशतवाद्यांनी त्यांना पाकिस्तानमध्ये पूल आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होतं अशी माहिती दिली आहे. या दहशतवाद्यांनी गर्दीच्या रेल्वे मार्गांचा आणि त्यांच्या वेळेचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये दीड किलो आरडीएक्सही सापडला. या RDX ने अनेक मोठे स्फोट घडवले जाऊ शकले असते.

admin
Author: admin

और पढ़ें