राष्ट्रवादीच्या गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात मूरळी
डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात महिला आंदोलन करत आहेत. गॅस दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यात नुकतच पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आला आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.
दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन जागरण गोंधळ आंदोवन केलं. केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट चौकात जागरण गोंधळ करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी हजेरी लावली होती.
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज ओरड होत असताना महिला देखील त्याच दरवाढीमुळे हैराण झालेल्या आहेत. गॅस सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढ कमी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.