देश

पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 11 हजार 500 कोटींचं पॅकेज

राज्यात काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) तसेच कोकणातील चिपळूण आणि महाडला (Mahad Flood) पुराचा मोठा फटका बसला. या पुरामुळे अनेकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागल. दरम्यान आता राज्य सरकारने (Maharashtra) दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेजला मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने एकूण 11 हजार500 कोटीचं पॅकेज जाहीर केलंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. (maharashtra state government has permitted to package of Rs 11 thousand 500 crore for flood and distress victims in westran maharashtra and konkan)

Related Articles

Back to top button