Search
Close this search box.

भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं आज निधन झालं आहे. यशपाल शर्मा 1983च्या वर्ल्ड कपच्या इंडिया टीमचा भाग होते. मंगळवारी सकाळी हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. ते 66 वर्षांचे होते.

यशपाल शर्मा यांनी भारतासाठी एकूण 37 टेस्ट मॅचेस खेळल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी 34 च्या सरासरीने 1606 रन्स बनवले होते. यासोबत त्यांनी एकूण 42 वनडे मॅचेस खेळल्या होत्या. ज्यामध्ये त्या 883 रन्स केले होते.

1983च्या वर्ल्ड कपसाठी यशपाल शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात त्यांनी 89 रन्सची खेळी केली होती. दरम्यान त्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय देखील झाला होता. इतकंच नव्हे तर सेमीफायनलमध्येही त्यांच्या खेळाची जादू पहायला मिळाली होती. सेमीपायनलच्या मॅचमध्ये त्यांनी 61 धावांची उत्तम खेळी करत इंग्लंडसारख्या बलाढ्य टीमवर मात केली होती.

मात्र 1983 च्या वर्ल्ड कपनंतर यशपाल शर्मा यांच्या करियरला चढता आलेख मिळताना दिसला नाही. खराब परफॉर्मन्समुळे यशपाल शर्मा यांना टेस्ट टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शिवाय वनडेमध्ये देखील त्यांचा समावेश केला गेला नाही. यानंतर त्यांनी वनडेमध्येही पुनरागमन करण्यास अयशस्वी ठरले.

admin
Author: admin

और पढ़ें