छत्रपती संभाजीराजे म्हणाले यंदा शिवराज्याभिषेक घरुनच साजरा करा, कारण की….
छत्रपती संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं, मिळेल त्या वाहनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला पोहोचा. पण आता फार कमी लोकांना रायगडावर परवानगी असल्याने, छत्रपती संभाजीराजे यांना यूटर्न घ्यावा लागला आहे. यावर्षी आपण शिवराज्याभिषेक सोहळा हा घरुनच साजरा करा, असं आवाहन संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केलं आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या लढ्यावर काय रणनिती ठरवतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दरवर्षी दिनांक ५ आणि ६ जूनला थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. तेव्हा उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्यात शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दुर्गराज रायगड भरुन पावतो.
परंतु गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांना गर्दी करण्यासाठी मनाई असल्याने सरकार ने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या वर्षीही “शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक घराघरात साजरा करण्यात येणार आहे आणि हा घरी साजरा केलेला सोहळा यावर्षी देखील या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावर संभाजीराजेंनी सर्व शिवभक्तांना एक पत्र लिहले आहे.