विलासरावांचा जन्मदिन : ”देवा, ते दिवस पुन्हा परत आले पाहिजेत” – रितेश देशमूख भावुक
महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आज विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. बॉलिवूड स्टार आणि विलासरावांचे धाकटे पुत्र रितेश देशमुख यांनीही बाबांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूड स्टार रितेश देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्या लहानपणीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोत रितेश देशमुख आणि विलासराव देशमुख दिसत आहेत. ‘देवा, घडाळ्याचे काटे मागे फिरूदे, हे दिवस पुन्हा येऊ देत. पप्पा मला तुमची आठवण येतेय’ असे रितेश यांनी म्हटलं आहे.
रितेश सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात. विलासराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे रितेश त्यांच्याप्रती असलेला रितेश सोबतच त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी देखील ट्विट करीत सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. बाप लेकीतली मिठी चिरंतर राहील, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टसह जेनेलिया यांनी त्यांच्या लग्नातील फोटो देखील शेअर केला आहे.
आदर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत असतात.