देश

पश्चिम बंगालच्या विजयासाठी शरद पवारांकडून ममता दीदींना शुभेच्छा!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच पारड्यात आपली मतं टाकल्याचं दिसून येतंय. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलंय.

‘जबरदस्त विजयासाठी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन! जनतेच्या कल्याणासाठी तसंच साथरोगामुळे समोर ठाकलेल्या आव्हानाला सामूहिकरित्या सामोरं जाण्यासाठी आपलं कार्य चालू ठेवू’ असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

तर, तामिळनाडूमध्ये डीएमकेनं मिळवलेल्या निर्णायक आघाडीसाठी शरद पवार यांनी एम के स्टॅलिन यांचंही कौतुक केलंय. ‘आपल्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेच्या सेवेसाठी शुभेच्छा’ असं ट्विट पवारांनी केलंय.

पश्चिम बंगालमध्ये १४७ हा बहुमताचा आकडा आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं हा आकडा अगदी सहजच पार केलाय. दुसऱ्या क्रमांकावर राज्यात भाजपला स्थान मिळालंय. भाजपनंही १०० हून अधिक जागांवर वर्चस्व मिळवल्याचं या निकालातून दिसून येतंय.

पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, १, ६, १०, १७, २२ आणि २६ एप्रिल अशा आठ टप्प्यांत नागरिकांनी आपलं मत नोंदवलं.

Related Articles

Back to top button