देश

अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, मुंबईत उपचार सुरू

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर (Kirron Kher) यांच्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. किरण खेर यांना मल्टीपल माइलोमा जो एक प्रकारचा ब्लड कॅन्सर झाला आहे. किरण खेर (Kirron Kher suffering from blood cancer) यावर मुंबईत उपचार घेत आहेत.

किरण खेर यांचे मित्र आणि भाजप चंदीगडचे मेंबर अरूण सूद यांनी बुधवारी एक खास पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. सुद यांनी म्हटलं की, ‘किरण खेर गेल्यावर्षांपासून स्वतःवर उपचार घेत आहे. आता त्या लवकरच बऱ्या होतील.’

गेल्यावर्षी आजाराची माहिती कळली
सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार,’गेल्यावर्षी 11 नोव्हेंबरला त्यांचा हात चंदीगडच्या राहत्या घरी फ्रॅक्चर झाला. त्यानंतर चंदीगडच्या Post Graduate Institute of Medical Education and Research मध्ये उपचार घेत असताना त्यांना मल्टीपल माइलोमाच्या सुरूवातीची लक्षणे आढळली. त्यांचा हा त्रास डाव्या हाताच्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर 4 डिसेंबर 2020 रोजी मुंबईतील एअरलिफ्ट करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत.

मुंबईत सुरू आहे उपचार
गेल्या चार महिन्यांपासून किरण खेर मुंबईत उपचार घेत आहेत. त्या उपचाराकरता कोकिलाबेन रुग्णालयात दाखल नाहीत मात्र उपचाराकरता त्यांना अनेकदा रुग्णालयात जावं लागतं.

किरण खेर यांच्याबाबत पक्षात चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या आजाराबाबत सांगण्यात आलं आहे. किरण खेर अनेक दिवसांपासून चंदीगडपासून लांब होत्या. विरोधी पक्ष त्यांच्यावर अनेक प्रश्न उभे करत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात किरण खेर चंदीगडमध्ये आल्या होत्या. मात्र आता त्या उपचार घेत आहेत.

Related Articles

Back to top button