Menu

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘सविता भाभी…. तू इथंच थांब !!’ असं लिहिलेलं होर्डिंग्ज चर्चेत आलं. हे होर्डिंग्ज होतं ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ सिनेमाचं. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.

‘सविता भाभी’ या कॅरेक्टरची तरूणाईत क्रेझ आहे. आणि याच सविता भाभीला दहीहंडी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवायची अशी चर्चा रंगली आहे. त्या निमित्ताने या मंडळींची नेमकी कशी तयारी सुरू होते हे या ट्रेलरमधून दाखवलं आहे.

ट्रेलरच्या माध्यमातून सिनेमातील पात्र उलघडली गेली आहे. टिझरमधून फक्त सविता भाभीचा आवाज ऐकू येत होता. ही सविता भाभी अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारली आहे. या सिनेमात अभिनेत्री पर्ण पेठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या सिनेमात दिसणार आहे.

अश्लील शब्द उच्चारला तरी अनेकांच्या नजरा आपल्यारकडं वळतात. परंतू आता ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर या चित्रपटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

अलोक राजवाडे या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सिनेमात सायली पाठक, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार आहेत. सिनेमाची उत्सुकता प्रचंड  वाढली आहे. सिनेमा 6 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.