Menu

देश
Man vs Wildच्या चित्रीकरणादरम्यान रजनीकांत यांना दुखापत

nobanner

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत डिस्कव्हरीच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड Man vs Wild या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी जोर धरला. किंबहुना या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची रुपरेषाही समोर आली होती. बेअर ग्रिस्लसोबतच्या थरारक आणि साहसी प्रवासाच्या सुरुवातीलाच एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. थलैवा रजनीकांत यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांनी Man vs Wildचं चित्रीकरणादरम्यान काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं.

चित्रीकरणासाठी म्हणून रजनीकांत कर्नाटकच्या बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्यात पोहोचले होते. Man vs Wildया कार्यक्रमाचा होस्ट, लोकप्रिय आणि तितकंच धाडसी व्यक्तीमत्वं बेअर ग्रिल्स याच्यासोबत रजनीकांत यांचं चित्रीकरण सुरु होतं. पण, त्यांच्या दुखापतीमुळं हा सारा बेत काहीसा बारगळला होता.

दरम्यान, अनेकांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी चिंताही व्य़क्त केली. हेच चित्र पाहता खुद्द थलैवाकडूनच त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यात आली. ‘Man vs Wildच्या भागाचं चित्रीकरण मी पूर्ण केलं आहे. तिथे खुप सारी काटेरी झुडुपं असल्यामुळे काही अडचणी आल्या. मला कोणतीही जखम झाली नाही. फक्त थोडं खरचटलं. पण, आता मात्र मी पूर्णपणे बरा आहे’, असं ते चेन्नई विमातळावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले.

सुपरस्टार रजनीकांत एका अनोख्या कार्यक्रमात झळकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यांच्यापूर्वीही काही जगप्रसिद्ध व्यक्ती बेअर ग्रिल्ससोबत Man vs Wild या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे.