Menu

अजान सुरु होताच जेव्हा मोदींनी थांबवलं आपलं भाषण

देशात सध्या गायक सोनू निगम यांनी अजानवर केलेल्या ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक जण अजानवर सोनू निगमवर टीका करत आहेत तर अनेक जण त्याचं समर्थन देखील करत आहे. पण काही दिवसांपूर्वी एका निवडणुकीच्या रॅलीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक भाषण करत असतांना थांबले. कारण जवळच असलेल्या मस्जिदमध्ये अजानचा आवाज सुरु झाला.

अजान जोपर्यंत थांबत नाही तो पर्यंत पंतप्रधान मोदी थांबले होते. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.