Menu

दुनिया
१८ भारतीयांसह तीन नौका पाकिस्तानच्या ताब्यात!

nobanner

पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने तीन नौकांसह १८ भारतीयांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. या नौकांना सर क्रीक खाडीजवळ ताब्यात घेण्यात आले असल्याची, पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

काही महिने अगोदर पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा एजन्सीकडून मासेमारी करणारी भारतीय नौका ‘सुदामा पुरी’वर गोळीबार देखील करण्यात आला होता. यामुळ सातजणांसह ही नौका पाण्यात उलटली होती. यातील सहाजणांना भारतीय तट रक्षक दलाच्या जवानांनी वाचवले होते.