Menu

देश
हार्दिकनंतर ऋषभ पंतनेही शेयर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो

nobanner

टीम इंडियाचे खेळाडू नवीन वर्षी सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. विराट कोहली अनुष्का शर्मासोबत स्वित्झर्लंडला गेले आहेत. या दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. हार्दिक पांड्यानेही नताशा स्टॅनकोविचसोबत साखरपुडा केल्यानंतर दोघांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले. आता ऋषभ पंतनेही गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

बर्फाच्या डोंगरांवरचा ऋषभ पंत आणि इशा नेगीचा हा फोटो आहे. मी जेव्हा तुझ्यासोबत असतो तेव्हा स्वत:ला सर्वात जास्त पसंत करतो, असं कॅप्शन ऋषभ पंतने या फोटोला दिलं आहे. या फोटोसोबत ऋषभने हृदयाचा इमोजी वापरला आहे.

याशिवाय पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. तर इशानेही इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोंमध्ये पंतला टॅग केलं आहे. “माय मैन, माय सोलमेट, माय बेस्ट फ्रेंड, लव ऑफ माय लाइफ, ऋषभ पंत, अशी कमेंट इशाने केली.

ऋषभ पंतची भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. या सीरिजची पहिली मॅच रविवारी गुवाहाटीमध्ये होणार आहे.