Menu

खेल
विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याविरोधात गुन्हा दाखल

nobanner

भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, मैदानातील सुरक्षेचं कडं मोडून विराटची सेल्फी घेण्यासाठी धावलेल्या चाहत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय चाहत्याचं नाव मोहम्मद खान असल्याचं समजतंय, पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात, उपहाराआधीच्या सत्रामध्ये १५ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहली शॉर्ट मिड-ऑन जागेवर क्षेत्ररक्षण करत होता. याचवेळी चाहत्याने मैदानात शिरत विराटसोबत सेल्फी काढली. याआधीही राजकोट कसोटीत असा प्रकार घडला होता, यावेळी विराटने चाहत्यांना असा प्रकार करणं चुकीचं असल्याचं सांगतं आपली नाराजी व्यक्त केली होती.