Menu

दुनिया
लंडन ब्रिज हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने स्वीकारली

nobanner

मध्य लंडनमधील पुलावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी गटाने घेतली आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले होते,  तर हल्लेखोर दहशतवाद्यास पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

आयसिसच्या अमाक या वृत्त संस्थेने म्हटले आहे की, आयसिसच्याच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. साइट इंटेलिजन्स ग्रुप या जिहादी कारवायांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरही याबाबत माहिती दिली आहे. हल्लेखोर उस्मान खान हा दहशतवादी होता व त्याला सात वर्षांपूर्वी लंडन शेअर बाजारात बॉम्बस्फोटाचा कट, तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावणी चालवणे या आरोपांखाली २०१२ मध्ये दोषी ठरविण्यात आले होते.