Menu

देश
भारतीय क्रिकेटपटूच्या कारला अपघात, मुलाला अटक

nobanner

भारताचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांचा मुलगा फिदेलला मुंबई पोलिसांनी जामीन दिला आहे. कार अपघात प्रकरणी फिदेलला पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी सबा करीम आपल्या मुलासोबत पेडर रोडवरुन वरळीला जात होते. यावेळी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना फिदेलचं गाडीचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे रस्ता क्रॉस करणाऱ्या २८ वर्षांची महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेवर सध्या उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी २७९ आणि ३३८ नुसार एफआयआर दाखल केला आणि फिदेलला अटक केली. अटक केल्यानंतर लगेचच फिदेलला जामीन देण्यात आला आहे.