Menu

खेल
भारताच्या मंजू राणीची अंतिम फेरीत धडक

nobanner

रशियात सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात भारताच्या मंजू राणीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत मंजूने थायलंडच्या सी.सक्सरतवर ४-१ ने मात केली. तब्बल १८ वर्षांच्या कालावधीनंतर भारताची महिला बॉक्सर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत मंजू राणीकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा वाढलेल्या आहेत.

भारताच्या मेरी कोमला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ६ सुवर्णपदकं जिंकणाऱ्या मेरी कोमचं सातव्या सुवर्णपदकाला मुकावं लागलं. ५१ किलो वजनी गटात टर्कीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र भारताच्या मंजू राणीने ४८ किलो वजनी गटात पदकाची आशा कायम ठेवली आहे.