Menu

देश
बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबत रोमँटीक अंदाजात दिसला खिलाडी कुमार

nobanner

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने म्यूझीक व्हिडिओच्या जगात एक पाऊल पुढे टाकले आहे. यूट्यूबवर त्याच्या ‘फिलहाल’ गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘फिलहाल’ गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्री कृती सेननची बहीण नुपूर सेसन झळकणार आहे. या गाण्यासाठी अक्षय गायक बी प्राकसोबत तिसऱ्यांदा काम करणार आहे.

अक्षय नेहमी त्याच्या ऍक्शन आणि स्टंटबाजीमुळे ओळखला जातो. पण या गाण्यात तो नुपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी ‘फिलहाल’ गाणं प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या चाहत्यांना त्याचा हा नवा अंदाज चांगलाच पसंतीस पडला आहे.

शिवाय, अक्षय त्याच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रूपयांचं मानधन स्वीकारणार आहे. अक्षय निर्माते वासु भगनानी यांच्या ऍक्शन चित्रपटासाठी १०० कोटी रूपयांचं मानधन घेणार आहे. अक्षय गेल्या काही दिवसांपासून एकापेक्षा एक चित्रपट देत आहे. त्यामुळे त्याचा भाव वधारला आहे.