Menu

दुनिया
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, लहान मुलीसोबत चार नागरिक जखमी

nobanner

जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात गोळीबार करत दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका लहान मुलीसोबत चौघे जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, “दहशतवाद्यांचं हे निर्दयी कृत्य आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमधील डांगेरपोरा येथे केलेल्या गोळीबार केला असून यामध्ये लहान मुलगी उस्मा जान हिच्यासहित चौघे जखमी झाले आहेत,”.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. “पोलीस घटनास्थळी उपस्थित असून तपास सुरु आहे,” अशी माहिती जम्मू काश्मीर पोलीस प्रवक्त्याने दिली आहे. याआधी २९ ऑगस्ट रोजी काही संशियत दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील परिम पोरा परिसरात गोळीबार करत एका नागरिकाला जखमी केलं होतं. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी हे हल्ले करत असल्याचं गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे.