Menu

खेल
चिंता करु नका, मी सुखरुप आहे ! निधनाच्या अफवेवर क्रिकेटपटूचं स्पष्टीकरण

nobanner

सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवांचा कोणाला कधी त्रास होईल हे सांगता येणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शोक व्यक्त करायला सुरुवात केली. यानंतर मोहम्मद नबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण देत आपल्या निधनाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

मोहम्मद नबीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र जगभरातल्या टी-२० क्रिकेट लीगमध्ये तो खेळत असतो. इंडियन प्रमिअर लिगमध्ये नबी सनराईजर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधीत्व करतो.