Menu

देश
कुर्ल्यात लोखंडी गजाचा खांब गाडीवर कोसळला

nobanner

मुंबईतल्या कुर्ला भागात चेंबूर – सांताक्रूझ लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. कुर्ल्याच्या कापडिया नगर जवळ लोखंडी गजाचा मोठा खांब दुपारी एक वाजताच्या सुमारास एका गाडीवर कोसळला.

मोठी दुर्घटना टळली

सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावरून जात असलेल्या गाडीचं नुकसान झालं.

हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. आज शुक्रवार असल्यानं बहुतांश दुकानदार आणि कामगार नमाजासाठी गेले होते.

परिणामी रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली.