Menu

देश
“कसाब हिंदू आणि २६/११ चा हल्ला हा हिंदू दहशतवाद असं भासवायचं होतं”

nobanner

अजमल कसाब हा हिंदू होता आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद होता असं लष्कर ए तोयबाला सिद्ध करायचं होतं. राकेश मारिया यांच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यावरुन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत.  ‘कसाबच्या हाती हिंदू धर्मातील धागा बांधण्यात आला होता. त्याची ओळख बदलण्यात आली होती. समीर दिनेश चौधरी असं नाव त्याला देण्यात आलं होतं. लष्कर-ए-तोयबाला २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केला आहे असं सिद्ध करायचं होतं.  कसाबला जागीच मारलं असतं तर असंच घडलं असतं. असं राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. यावरुनच काँग्रेसविरोधात पियुष गोयल हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

काय म्हटलं आहे गोयल यांनी ?

राकेश मारिया हे सगळं आत्ता का सांगत आहेत? जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हाच त्यांनी हे सत्य जगासमोर आणायला हवं होतं. पोलीस सेवेत असताना एखादी माहिती जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल तर ती त्यांनी सार्वजनिक करायला हवी होती. २६/११ च्या हल्ल्यावेळी एक मोठा कट काँग्रेसने रचला होता. काँग्रेसने रचलेले कुभांड या पुस्तकामुळे समोर आलं आहे. पी. चिदंबरम यांच्या सांगण्यावरुन हिंदू दहशतवाद्यांची एक बोगीच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. असंही गोयल यांनी म्हटलं आहे.