Menu

दुनिया
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात तीन ठार, सुरक्षेसाठी शाळा बंद

nobanner

अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबार झाला. ओक्लाहोमामध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झालाय. ओक्लाहोमाच्या डंकनमध्ये वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर पार्किंगमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव डंकनमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

दक्षिण-पश्चिमी ओक्लाहोमा येथील वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर सोमवारी सकाळी केलेल्या गोळीबारात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यात गोळीबार करणाऱ्याचा मृत्यूही झाला. पोलीस दलाचे डॅनी फोर्ड यांनी सांगितले, डंकनमधील वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर पार्किंगमध्ये दोघांना ठार करण्यात आले होते. गोळीबार करणाऱ्याने एका पुरुषाला आणि महिलेला ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी चालवली. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अमेरिकेच्या वॉलमार्ट स्टोअरबाहेर गोळीबाराची पाच महिन्यांतील तिसरी घटना आहे. दोन दिवस आधी कॅलिफोर्नियामध्ये फुटबॉल मॅचदरम्यान गोळीबार झाला होता. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. कॅलिफोर्नियात गेल्या आठवड्यातही शालेय विद्यार्थ्यांनी दोन मित्रांची गोळी मारून हत्या केली होती.